श्रीगोंदा : माजी आमदार राहुल जगताप यांना शंका ठेवू नका कामाला लागा असा थेट आदेश ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राहुल जगताप यांना दिला आहे. यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीची जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीलाच राहणार असून येथून राहूल जगताप हेच लढतील असे सुचवित पवार यांनी जगताप यांच्या उमेदवारीला ग्रीन सिग्नल दिला.
महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. विधानसभेच्या उमेदवारीबाबत या पक्षांचे प्रदेशाध्यक्ष निर्णय घोषीत करतील. पण श्रीगोंद्याच्या जागेबाबत आपल्यालाच काही शंका आहे काय ? असा सवाल करीत ज्येष्ठनेते शरद पवार यांनी जगताप यांना कामाल लागा असे सूचित केले आहे.
भेटी दरम्यान राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के यांनी भूमिका मांडली. शिर्के यांच्या बोलण्यातून श्रीगोंद्यातून महाविकास आघाडीतून कोण लढणार याचा व राहुल जगताप यांच्या उमेदवारीचा संभ्रम असल्याचा आशय आला. त्यावर पवार यांनी जगताप यांना कामाला लागा सांगून सगळा संभ्रम दूर केला.
पवार म्हणाले, शिवसेनेचे एक नेते श्रीगोंदे तालुक्यात येऊन त्यांच्या पक्षाचे एक उमेदवाराच्या नावाची घोषणा महाविकास आघाडीच्या वतीने केल्याचे समजले. पण ते खरे नाही असे करता येत नाही. ही जागा राष्ट्रवादीचीच असून तेथून आपणच लढणार आहोत.
.jpeg)
Post a Comment