अकोल्यात कांद्याला इतका भाव...

अकोले : येथील बाजार समितीत कांद्याचे  मंगळवार (ता. १७) लिलाव झाले. एक नंबर कांद्याला सर्वाधिक ४५११रुपयांचा भाव मिळाला.


येथील बाजार समितीत कांद्याच्या 4511 गोण्यांची आवक झाली. कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. 

कांद्याचे प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव : एक नंबर कांदा :  3601ते 4511, दोन नंबर कांदा  : 3001ते 3601, तीन नंबर कांदा : 2201 ते 3001, गोल्टी कांदा : 2601ते 3501, खाद : 2001 ते 2601.

कांद्यासह येथे भुसार मालाचे लिलाव झाले. यामध्ये सोयाबीन, मका, गहू, हरभरा आदीची चांगली आवक झाली. यामध्ये सोयाबीनला 4400 ते  4600, मका : 2500 ते 2750, गहू : 2400ते 2600, हरभरा : 5000 ते 6200 प्रतिक्विंटलला भाव मिळाला आहे.

अकोले बाजार समितीत रविवार, मंगळवार, गुरुवार या तीन दिवस गोणी लिलाव करून कांदा विक्री केली जाते. शेतकरीवर्गाने आपला शेतीमाल सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत बाजार समितीचे मुख्य बाजार आवारात विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समिती सभापती भानुदास पाटील तिकांडे, उपसभापती रोहिदास पाटील भोर व बाजार समिती संचालक व प्र. सचिव प्रकाश कोटकर यांनी केले आहे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post