श्रीगोंद्यात अजित पवार गटात नाराजी... काहीजण शरद पवार गटात जाण्याच्या तयारीत...

नगर : श्रीगोंदा येथील अजित पवार गटामध्ये नाराजी असल्याचे दिसून येत आहे. या नारजीतून काहीजण शरदचंद्र पवार गटात दाखल होणार असल्याची चर्चा सुरू झालेली आहे. याबाबत नाराजांची नावे कार्यकर्ते नावे घेऊ लागलेली आहेत.


विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येऊ लागलेली आहे. तसतसे श्रीगोंद्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. श्रीगोंद्यातील विविध पक्षातील नाराज मंडळी दुसर्या पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. काहीजण पक्षात राहून पक्षातील उमेदवाराच्या विरोधात प्रचार करण्याच्या तयारीत आहेत.

श्रीगोंद्यात सर्वाधिक नाराजी अजित पवार गटात आहे. या गटातील नाराज इतर पक्षात जाण्याच्या तयारीत आहेत. त्यातील काही नाराजांनी शरदचंद्र पवार गटाशी संपर्क साधला आहे. लवकरच ते शरदचंद्र पवार गटात सहभागी होणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची होणार आहे.

अजित पवार गट, भाजप गट व शिंदे गटातील नाराज मंडळी आज शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत. नाराज मंडळी लवकरच प्रवेश करणार आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post