मुंबई : केंद्रीय मध्य रेल्वे च्या पुणे विभागीय प्रवासी सल्लागार समिती (DRUCC ) सदस्यपदी संतोष पांडुरंग रायकर यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव व माजी खासदार सुजय य विखे पाटील यांच्या शिफारशीनुसार निवड करण्यात आली.ही निवड रेल्वे प्रवाशांच्या प्रश्न सोडवण्यासाठी तसेच त्या विभागातील रेल्वे स्थानकांचे परिसरातील विकास साधण्यासाठी या निवड करण्यात आली आहे.
अहमदनगर ते दौंड या महामार्गावरील रेल्वे प्रवाशांचे प्रश्न प्रामुख्याने सोडवण्यात येतील तसेच लोकल चालू करण्यासंदर्भात पाठपुरावा करू, असे निवडीनंतर असे संतोष रायकर यांनी सांगितले आहे.
त्या निवडीच्या मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे. संतोष रायकर हे 24 वर्ष भाजपाचे सक्रिय कार्यकर्ते असून सध्या ते भाजपा ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या निवडीचे स्वागत डॉ. सुजय विखे पाटील, आमदार बबनराव पाचपुते, आमदार राम शिंदे, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग आदींनी स्वागत केले आहे.
.jpeg)
Post a Comment