तीन दिवस पावसाचे...

नगर : जिल्‍ह्याच्या काही भागात २३ ते २५ सप्टेंबर २०२४ या कालावधीत विजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा व जोरदार पाऊस व २६ सप्टेंबर रोजी विजांच्‍या कडकडाटांसह हलक्‍या ते मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जिल्‍ह्यासाठी यलो अलर्ट इशारा जारी करण्‍यात आलेला आहे.


पुणे, नाशिक व अहमदनगर जिल्ह्यात अतिवृष्‍टी झाल्‍यास जिल्‍ह्यातील भिमा व घोड नदी, गोदावरी नदी तसेच प्रवरा व मुळा या नद्यांवरील धरणातून सोडलेल्‍या विसर्गामुळे नद्यांच्‍या पाणीपातळीत वाढ होऊ शकते. 

जिल्‍ह्यातील भिमा, घोड, गोदावरी, प्रवरा व मुळा या नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये. गडगडाटीच्‍या वादळादरम्‍यान व वीज चमकताना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. 

विजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post