श्रीगोंद्यात युवा नेत्यांच्या हाती प्रचार अन् प्रसिध्दीची धुरा... ज्येष्ठ नेत्यांसह कार्यकर्ते नाराज...

श्रीगोंदा : श्रींगोदा-नगर विधानसभा निवडणुकीत या पंचवार्षिकमध्ये चांगलीच चुरस निर्माण होणार आहे. ज्येष्ठांच्या विजयासाठी तरुणाई प्रचार व प्रसारात आघाडीवर आहेत. त्यामुळे आगामी निवडणूक चुरशीची होणार आहे. ही निवडणूक सर्वच नेत्यांसाठी प्रतिष्ठेची होणार असल्याचे दिसून येत आहे. 


राजकीय नेते त्यांच्या मुलांचे राजकीय भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सर्वच गोष्टीत आघाडीवर रहात होते. आजही जिल्ह्यात काही नेते मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे. काही झाले तरी आपल्या मुलाला राजकीय क्षेत्रात मोठ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचा प्रयत्न काहींकडून सुरु आहे. 

या प्रयत्नात जिल्ह्यातील काही मातब्बर यशस्वी झालेले असून पुन्हा यशस्वी होण्यासाठी काही प्रयत्न करीत आहे. काही पहिल्यापासूनच अपयशी ठरलेले पुन्हा अपयश येऊ नये म्हणून काही जणांच्या आतापासूनच शर्तीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत. या त्यांच्या प्रयत्नांना यश मिळते की अपयश मिळते हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यासह राज्यात मुलांचे भविष्य घडविण्यात नेते मंडळी व्यस्त असताना श्रीगोंदा तालुक्यात मात्र परिस्थिती उलटी आहे. श्रीगोंदा तालुक्यातील नेते मंडळींची  आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे भविष्य घडवण्यासाठी प्रयत्न करीत आहे. तरुणाईनेच आता भारती ज्येष्ठ मंडळींच्या प्रचाराची धुराच हाती घेतली आहे. 

या तरुणाईने आपल्या परीने एक फळी उभी करून प्रचार व प्रसार सुरू केलेला आहे. यामुळे जुने जाणकार नेते दुरावत असल्याचे चित्र सध्या श्रीगोंद्यात पहावयास मिळत आहे. या नाराजांना आपलंसं करून काहीजण पोळी भाजण्याचा प्रयत्न करीत आहे.

एकीकडे निवडणुकीला उमेदवार कोण असणार याची चर्चा सुरू आहे. प्रत्येकजण आपण उमेदवार राहणार असल्याचे भासवत आहे.

सध्याची निवडणूक यंत्रणा तरुणांच्या हाती गेल्याचे दिसून येत आहे. आमदार बबनराव पाचपुते यांची सगळी यंत्रणा विक्रमसिंह पाचपुते व प्रतापसिंह पाचपुते यांच्या ताब्यात आहे.  

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनुराधा नागवडे यांचीही यंत्रणा त्यांचे पुत्र पृथ्वीराज व दिग्विजय नागवडे यांच्या हाती असल्याचे दिसून येत आहे.  

घनश्याम शेलार यांची यंत्रणात यांचे पुत्र प्रशांत शेलार यांच्या ताब्यात त्यांची प्रचार यंत्रणा असल्याचे दिसून आहे. अण्णासाहेब शेलार यांच्या प्रचाराचे सगळे नियोजन त्यांचे पुत्र सरपंच असणारे ऋषिकेश शेलार यांच्या हाती आहे. 

राहुल जगताप व साजन पाचपुते यांच्याकडेच त्यांच्या प्रचाराच्या चाव्या आहेत. सध्या सर्वच नेत्यांच्या युवराजांनी प्राचाराची धुरा संभाळल्याने जिल्ह्यात एकच चर्चा सुरु झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post