नगर : माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात जोर धरत आहे. प्रत्यक्षात मात्र सुजय विखे या मतदारसंघातून उमेदवारी करणार नसल्याचे भाजप नेत्यांमधून बोलले जात आहे.
ते संगमनेरमधून उमेदवारी करणार असल्याचे फक्त भासवले जात असून प्रत्यक्षात सुजय विखे संगमनेरमधून निवडणूक लढविणारच नाही अशी चर्चासध्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु आहे. संगमनेर ऐवजी ते दुसर्याच मतदारसंघातून उमेदवारी करतील अशी चर्चा सध्या सुरू आहे.
संगमनेर विधानसभा मतदारसंघातून डॉ. सुजय विखे उमेदवारी करणार असल्याची जोरदार चर्चा जिल्हा सुरू आहे. याबाबत सुजय विखे यांनीही भाषणातून तसे जाहीर केलेले आहे. परंतु ते संगमनेर ऐवजी दुसर्याच मतदारसंघातून उमेदवारी करण्याची शक्यता आहे. तशी चर्चा भाजप वर्तुळात सुरू आहे.
विखे यांनी संगमनेर ऐवजी राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघातून उमेदवारी करावी अशी अपेक्षा भाजप कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.या कार्यकर्त्यांच्या अपेक्षेचा विखे यांनी विचार करावा अशी चर्चा सध्या सुरू आहे.
.jpeg)
Post a Comment