लोणी : जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला कोणाचा विरोध नाही. त्यांचा तो अधिकार आहे.त्यांच्या मागण्यासह धनगर व ओबीसीच्या समाजाच्या मागण्याबाबत सरकार सकारात्मक विचार करत असल्याची प्रतिक्रीया मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.
प्रवरा उद्योग समूहाच्या गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी उध्दव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या केलेल्या वक्तव्याची खिल्ली उडवली.
तुमच्या मनात काय आहे याला महत्त्व नाही. जनतेच्या मनात पुन्हा महायुती सरकार सतेवर आणण्याचा ठाम निर्धार आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांची वक्तव्य वैफल्यातून होत आहेत. आघाडीचे अस्तित्व फार दिवसाचे नाही हे सांगण्यासाठी कोणत्या ज्योतिषाची आवश्यकता नाही. मुख्यमंत्री महायुतीचा होणार असा ठाम विश्वास मंत्री विखे यांनी व्यक्त केला.
.jpeg)
Post a Comment