शेवगाव : शहरटाकळी (ता. शेवगाव) येथे मुख्यालयात न राहता घरभाडे घेण्याचा प्रकार शेवगाव तालुक्यातील पाच शिक्षकांच्या अंगलट आलेला आहे. शेवगाव पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकाऱ्यांनी पाचही शिक्षकांकडून घरभाडेपोटी घेतलेली सुमारे दहा लाखांची रक्कम वसूल करण्याचा आदेश दिलेला आहे.
या विरोधात या शिक्षकांनी प्राथमिकचे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्याकडे अपील केले होते. या प्रकरणाची सुनावणी पाटील यांच्यासमोर होऊन त्यांनी गटशिक्षणाधिकारी यांचा आदेश कायम ठेवला आहे. त्यामुळे या शिक्षकांच्या पगारातून आता घरभाड्याची वसुली होणार आहे.
ढोरसडे व नवीन शहरटाकळी येथील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी मुख्यालयात राहत असलेले वर्षनिहाय ग्रामसभेचे ठराव सादर केलेले नाहीत. त्यामुळे त्यांना अदा करण्यात आलेली घरभाडे भत्त्याची रक्कम वसूल करण्यात यावी, अशी तक्रार अंत्रे येथील ज्ञानदेव सोलट यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांनी सखोल चौकशी केली.
तक्रारदारांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आल्यामुळे नवीन शहरटाकळी व ढोरसडे येथील पाच जिल्हा परिषद शिक्षकांकडून तब्बल दहा लाख रुपये वसूल करण्याचा आदेश दिला होता. यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
या आदेशाविरोधात त्या पाचही शिक्षकांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे अपील केले होते. त्या अपिलाची सुनावणी पूर्ण होऊन शिक्षकांनी मुख्यालयी राहत असलेल्या वर्षनिहाय ठराव सादर केलेले दिसून न आल्यामुळे शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांनी गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांचा आदेश कायम ठेवून पाच शिक्षकांकडून तब्बल दहा लाख रुपये वसुलीचे आदेश दिलेले आहेत.
या आदेशामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. मुखयालयी न रहाता घरभाडे लाटणार्या शिक्षकांमध्ये का आदेशाने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणतील सर्वच शिक्षकांवर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे.
.jpeg)
Post a Comment