नगर ः शिक्षण क्षेत्रातही आता हेवेदावे सुरु झालेले आहे. यामुळे शिक्षण क्षेत्र बदनाम हो आहे. जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षकाविरोधात एका शिक्षिकेने तक्रार केलेली आहे. यामुळे जिल्ह्यात खळबळ उडालेली आहे.
जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षक आपल्याला त्रास देतात असे संबंधित शिक्षिकेने पोलिस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. परंतु पोलिस प्रशासनाकडे मात्र त्या शिक्षकेने तक्रार दिल्याचे शिक्षकांमधून सांगितले जात आहे.
या प्रकरणाची पोलिसांनी सखोल चौकशी करूनच गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिक्षकांमदून होत आहे. याबाबत शिक्षकांमधूनही एक शिष्टमंडळा पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याची चर्चा सध्या जिल्ह्यातील शिक्षकांमध्ये सुरु आहे.
संबंधित शिक्षिकेने दिलेल्या तक्रारीत संबंधित शिक्षक आपल्याला त्रास देत असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणी पोलिस प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment