गणेशविसर्जन मिरवणुकीत विधानसभा निवडणूक जिंकल्याचा सारखाच जल्लोष...

जामखेड :  शहरातील विसर्जन मिरवणुकीत प्रत्येक मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीत आमदार रोहित पवार व आमदार राम शिंदे गाण्याच्या ताळावर बेभानपणे थिरकले होते. जणू विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर जल्लोष केल्यासारखे दिसून येत होते.


मिरवणुकीत सहभात घेतला होता . विसर्जन मिरवणूक तब्बल ८ तास चालली. शेवटच्या मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन रात्री १२.५ मिनिटांनी झाले. प्रचंड जल्लोषात संघर्ष तरुण मंडळाची गणेश विसर्जन मिरवणूक निघाली होती. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण केली.

मेनरोड परिसरात आबालवृद्धांची एकच गर्दी झाली होती. सायंकाळी शहरातील सर्व रस्ते मिरवणुकानी फुलून गेले होते बाळगणेश मंडळानी सकाळी चारचाकी हातगाड्यामधून मिरवणुका काढल्या दुपारी काही काळ ओस पडलेले जामखेड शहरातील रस्ते सायंकाळी मिरवणुकीच्या गर्दीने फुलून गेले होते तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड दांडगा उत्साह दिसून आला.

विसर्जन मिरवणुकीत गणेश भक्तांचे स्वागाताचे स्टेज स्वतंत्र होते . परंतु नाचण्यात सुद्धा दोघांची स्पर्धाच दिसत होती. यावेळी ही जणू विधान सभेची विसर्जन मिरवणुक तर नाही ना ? 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीत एकाचे तरी विसर्जन होणार अशी चर्चा जनतेत  सुरु होती.  

कोणताही गंभीर व अनुचित प्रकार घडू नये, म्हणून पोलिस निरीक्षक श्री. महेश पाटील यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता . गणेश विसर्जनाचा सोहळा शांततेत व उत्साहात पार पडला य.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post