श्रीगोंद्यातून अनुराधा नागवडे लढणार..

नगर ः विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदर श्रीगोंदे-नगर विधानसभा मतदारसंघात राजकीय धुराळा उडत आहे. या मतदारसंघातील इच्छूक उमेदवारांनी कार्यकर्त्यांची जमवाजमव करून तालुक्यात संपर्क अभियान सुरु केले आहे.



महाविकास आघाडीकडून माजी आमदार राहुल जगताप व महायुतीकडून पाचपुते कुटुंबातील व्यक्तीलाच उमेदवारी मिळणार असल्याचे स्पष्ट झालेले. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या अनुराधा नागवडे यांच्या अडचणीत वाढ झालेली आहे. त्यांना आता अपक्ष उमेदवारी करावी लागणार आहे. त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

शिवाजीराव नागवडे यांना मानणारा वर्ग श्रीगोंद्यात मोठ्या प्रमाणात आहे. हीच ताकद अनुराधा नागवडे यांची आहे. या सर्वांना सोबत घेऊन महिलांचे संघटन आणि सामान्यांचा विश्वास संपादन करुन अऩुराधा नागवडे यांनी निवडणुकीत उतरावे, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तरी त्यांनी अपक्ष निवडणूक लढविणे गरजेचे आहे. अनेकदा थांबवावे लागले आहे. परंतु आता थांबायचे नाही तर निवडणुकीत उतरून विजय मिळवायचा आहे, असे नागवडे समर्थक बोलत आहेत. आम्ही संकल्प केला आहे, तुम्ही आता आम्हाला साध द्यावा. अन निवडणुकीच्या आखाड्यात उतरा, अशी मागणीच कार्यकर्त्यांमधून होत आहे.

नागवडे यांनी श्रीगोंद्यात बुथ कमिटी प्रमुखांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत आता काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बैठकीत चर्चा काही होऊ द्या, आम्ही नागवडे समर्थक आता सर्वजण एकत्र येऊ, असा निर्धार आता अनेकांनी व्यक्त केले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post