राहुरी ः राहुरी-नगर-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून कोण उमेदवारी करणार याविषयी सध्या राजकीय पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे. कार्यकर्ते आपलाच उमेदवार उभा राहील, असे सांगत आहेत. मात्र या मतदारसंघातून भाजपकडून माजी आमदार शिवाजी कर्डिले, माजी खासदार सुजय विखे व माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम उमदेवार म्हणून नावे चर्चेत आहेत. सध्या कदम यांचे नाव या मतदारसंघातून आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे.
आमदार शिवाजी कर्डिले व माजी खासदार सुजय विखे यांना राहुरीसह नगर तालुक्यातून मोठा विरोध असल्याचे दिसून येत आहे. सध्या पाथर्डी तालुक्यातील काही गावांमध्ये तिच परिस्थिती आहे. त्यामुळे या मतदारसंघातून आमदार शिवाजी कर्डिले व माजी खासदार सुजय विखे यांना पक्षाने उमेदवारी देण्याचा विचार करू नये, असे मत भाजपमधील काही ज्येष्ठ नेते व्यक्त करीत आहेत.
या मतदारसंघातून उमेदवारी द्यायची असेल तर सत्यजित कमद यांच्या नावाचा विचार होणे गरजेचे आहे. नवीन चेहरा असून नव्या दमाचा उमेदवार असल्याने त्याचा फायदा निवडणुकीत होणार आहे. तसेच भाजपमध्ये त्यांच्या नावाला कोणाचाच विरोध राहणार नसून सर्वजण एक दिलाने त्यांचे काम करतील. त्यामुळे भाजपने या मतदारसंघातून सत्यजित कदम यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत आहे.
या मतदारसंघातून उमेदवारीसाठी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचेही नाव आघाडीवर आहे. त्यांनाही या मतदारसंघातील कार्यकर्त्यांमधून चांगली साथ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवीन चेहरा असल्यामुळे त्यांना मतदारांकडूनही चांगली पसंती मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप कार्यकर्त्यांची एक फळी कदम यांच्या पाठी मागे उभी राहण्यास तयार आहे.

Post a Comment