उमेदवार बदल्याने भाजपला फटका बसणार.. राजळे यांच्यामुळे शेवगाव-पाथर्डीत विकास.. विरोधकांशी हातमिळवणी करून उमेदवार बदलण्याची मागणी

निवडणूक म्हटल की आरोप-प्रत्यारोप सुरुच असता. मात्र निवडणुकीच्या काळातच हे आरोप-प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात का होतात, याच काळात विकासाचे मुद्दे सर्वांना का आठवतात, याच काळात एकमेकातील दोषही सर्वांना का दिसतात, इतर वेळी सगळे जण डोळेझाक का करीत असतात, असे एक ना अनेक प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केले जात आहे. 


निवडणुकीची चाहूल लागताच सर्वजण एकमेकांवर चिखलफेक करून सामाजिक वातावरण तणावपूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यातून एकमेकांची मने दुखावली जातात. नेते मंडळी आरोप करून मोकळे होतात, मात्र कार्यकर्ते एकमेकांशी भांडत असतात. हे प्रत्येकाने लक्षात घेतले पाहिजे. तसाच काहीसा प्रकार आता शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात सुरु आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या विरोधात भाजपमधील काहीजण विरोधी भूमिका घेत आहेत. मात्र ही भूमिका निवडणुकीच्या तोंडावर का घेण्यात येत आहे, असा सवाल आता उपस्थित होत आहे.

शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात विकासाची गंगाच वाहत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. या मतदारसंघातील रस्त्यांपासून पाणी व वीज, सभामंडप आदी विविध विकास कामे करण्यासाठी आमदार मोनिका राजळे यांनी प्रयत्न केलेले आहे. त्यामुळेच या तालुक्यात विकास झाल्याचे चित्र दिसून येत आहे. ज्यांना काही विकास कामे करता आली नाही तेच आता राजळेंवर आरोप करून त्यांना कोंडीत पकडण्याचे काम करीत आहेत. 


यामध्ये विरोधकांसह काही भाजपमधील मंडळींचा समावेश असला तरी विकास कामे केल्याने राजळे यांच्या पाठिशी कार्यकर्त्यांची मोठी फळी दिसून येत आहे. जनतेचाही कौल त्यांच्याच बाजुने राहील, असे मतच भाजपमधील कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत. त्यामुळे सध्या राजळे यांच्या विरोधात पक्षातील काहींनी सुरु केलेल्या विरोधाला वरिष्ठ नेतेही तितकेच गांभिर्याने घेतील, असे वाटत नाही, अशीच चर्चा मतदारसंघात सुरु आहे.

शेवगाव- पाथर्डी मतदारसंघात भारतीय जनता पक्षांतर्गत उमेदवारीवरून मोठी दुफळी निर्माण झाल्याचे फक्त भासविले जात आहे. प्रत्यक्षात तसे काहीच नाही. तीन ते चार जण सोडले तर कोणीलाही या मतदारसंघातील उमेदवार बदलावा, असे वाटत नाही. काहींनी विरोधकांशी हात मिळवणी करून उमेदवार बदलावा, असा प्रयत्न सुरु केलेला असल्याचा आरोप आता भाजप कार्यकर्त्यांमधून केला जात आहे. राजळे यांना डावलून काहींना आपल्याला उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 

मात्र पक्ष बांधणीसाठी कोणी किती काम केले, मतदारांपर्यंत कोण किती पोहचले याचाही अभ्यास होणे गरजेचे आहे. हाच अभ्यास करून पक्ष उमेदवारी देत असतात. मात्र काहीजण आता फक्त उमेदवारी मिळावी, यासाठी विरोध करीत आहेत. मात्र त्यांचा विरोध हा आगामी काळात कमी होईल, अशी आशा सर्वांना लागली आहे.

राजळे यांनी मागील दहा वर्षात अनेक विकासात्मक काम केलेली आहेत. या कामाच्या बळावरच त्या तिसऱ्यांचा निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यांचा या निवडणुकीत विजय निश्चित आहे. त्यामुळे कोणी कितीही त्यांच्यावर टीका केली तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही. राजळे या भाजपाच्या विजयी उमेदवार आहेत. जिल्ह्यातील भाजपच्या इतर उमेदवारांपेक्षा राजळे यांच्या विजयाची खात्री 100 टक्के कार्यकर्त्यांना आहे. त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पक्षांतर्गत असलेल्या गटबाजीला लगाम लावणे गरजेचे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post