श्रीगोंदा : विधानसभा निवडणुकीत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून उमेदवारी मिळेल अशी शक्यता होती. मात्र सर्वांचीच निराशा झाली. ऐनवेळी श्रीगोंद्याची जागा उध्दव ठाकरे गटाला गेली. त्यामुळे जगताप यांनी बंडखोरी करीत निवडणूक लढवली. त्यात ते पराभूत झाले आहेत. आता अजित पवार गटात दाखल होणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून निलंबित केलेले माजी आमदार राहुल जगताप यांनी अजित पवार यांची भेट घेतली. मंत्रिमंडळ विस्तारानंतर राहुल जगताप हे अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगताप यांनी श्रीगोंद्यातून बंडखोरी केल्यानंतर पवार गटाने त्यांना पक्षातून निलंबित केले होते.
राहुल जगताप हे अजित पवार गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. जगताप हे माजी आमदार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा मतदारसंघातून शरद पवारांकडे तिकीट मागितले होते.
मात्र जागावाटपात हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या वाटेला गेला. त्यामुळे राहुल जगताप यांनी बंडखोरी करत अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली. परंतु त्यांना पराभवाचा धक्का बसला. त्याचवेळी पवार गटाने त्यांचे पक्षातून निलंबनही केले.
राहुल जगताप यांनी अजित पवार यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला उधाण आले आहे. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर राहुल जगताप हाती 'घड्याळ' बांधण्याची शक्यता आहे.
Post a Comment