संगमनेर : गुणवत्ता पूर्ण सीबीएससी पॅटर्नचे शिक्षण देणाऱ्या अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूलने विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाकरता सातत्याने विविध उपक्रम राबवले असून यातून अनेक विद्यार्थी राज्य पातळीवर चमकले आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या वार्षिक स्नेहसंमेलन मधून सादर झालेल्या धमाकेदार व दर्जेदार कार्यक्रमांमधून हे स्नेहसंमेलन संस्मरणीय ठरले.
अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल मध्ये झालेल्या अमृत पर्स 2024 युनायटिंग द वंडर्स अराउंड हे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.यावेळी सामाजिक कार्यकर्त्या सौ.कांचनताई थोरात, संस्थेच्या विश्वस्त सौ.शरयूताई देशमुख, प्राचार्य जे.बी.सेठी आदी उपस्थित होत्या.
या सांस्कृतिक कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांनी सोलो डान्स, ग्रुप डान्स, शास्त्रीय संगीत, फ्युजन सॉंग, फॅशन शो,पाश्चात्य आणि लोककलांचे धमाकेदार सादरीकरण केले. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे भव्य दिव्य स्टेजवर आकर्षक सजावट आणि सुंदर वेशभूषा यामुळे लहान चिमुकल्यांचे कार्यक्रम हे मेट्रोसिटीतील लाईव्ह कॉन्सर्ट कार्यक्रमाप्रमाणे झाले. मराठमोळ्या गीतांना टाळ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला तर फ्युजन साँग ने अंगावर शहारे आणले.
कांचनताई थोरात म्हणाल्या की, अभ्यासाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कला कौशल्यांना वाव देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन झाले असून यामध्ये विद्यार्थ्यांनी सर्व नियोजन केले आहे. येणाऱ्या काळामध्ये परिपूर्ण विद्यार्थी गरजेचा असून याकरता अमृतवाहिनी मधून होत असलेले काम नक्कीच इतरांसाठी आदर्शवत असल्याच्या त्या म्हणाल्या.
शरयूताई देशमुख म्हणाल्या की,आपल्या संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी विविध पदांवर काम करत असून या सर्व विद्यार्थ्यांचा संस्थेला कायम अभिमान आहे. अभ्यास छंद कला कौशल्य या सर्व गुणांमध्ये विद्यार्थ्यांनी परिपूर्ण व्हावे याकरता विविध उपक्रमांचे आयोजन होत असते.
या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त माजी विद्यार्थी तेजस मेहेत्रे गीतिका राजपाल यांचा विशेष सत्कार करण्यात आला तर राष्ट्रीय रंगवस्तव स्पर्धा चॅलेंज सॉल्विंग स्पर्धा आणि राष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप विजेत्यांचाही सौ.कांचनताई थोरात यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या सर्व विद्यार्थ्यांचे मा.शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, सौ. शरयूताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ.जे.बी.गुरव,प्राचार्य सौ.जे.बी.सेठी यांनी अभिनंदन केले आहे.
Post a Comment