माणसाचे गीत गाणारे डॉ. सुधीर तांबे

अहमदनगर जिल्ह्यातीलसंगमनेर तालुक्यातील प्रवरा नदीच्या तीरावरील जोर्वे हे माझे माहेर. पंचक्रोशीत थोरात परिवाराला समाजात मोठी प्रतिष्ठागावची पाटिलकी ही पंजोबंपासूनच थोरात परिवाराकडे. आजोबा संतूजी पाटील हे इंग्रजी मॅट्रिक झालेले. पुरोगामी विचाराचे जात-पात न पाळणारेवाचनाची आवड असणारे होते. माझे वडील भाऊसाहेब थोरात व आई सौ. मथुराबाई यांची मी सर्वात धाकटी मुलगीउंचीने कमी व नाजूक असल्याने कुटुंबात सर्वांचीच लाडकी होते. घरात राजकारणात समाजकारणात असल्याने पाहुण्यांची कार्यकर्त्यांची वर्दळ खुप असायची. गाव संगमनेर पासून लांब असल्याने दादांना भेटणारे पाहुणेकार्यकर्ते मुक्कामीच येत. पण माझी आई सर्वांना जेवण देणे मुक्कामाची सोय करणे हे स्वत: करायची. कुटुंबाच्या या संस्कारातूनच आम्ही भावंडे घडलो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post