संगमनेर : एका शाळेमध्ये एका शिक्षकाने चक्क आपले सहकारी असलेली शिक्षिकेला बेदम मारहाण केली. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थी हे दहशतीच्या सावटाखाली आहे. ही घटना शाळेमध्येच घडली असून त्यामुळे अनेक तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.
या घटनेनंतर संगमनेर तालुका पोलिस स्टेशनमध्ये शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या विद्यालयातील मुख्याध्यापकाच्या वाढदिवसानिमित्त आणलेल्या फुल गुच्छ वरून किरकोळ भांडणाचे मोठ्या भांडणात रूपांतर होऊन शिक्षकाने शिक्षकेला विद्यार्थ्यांसमोर बेदम मारहाण केली आहे.
यामध्ये शिक्षकेच्या कानाला मार लागला आहे. शिक्षकांनी शिक्षकेला मारहाणीचा प्रकार हा विद्यार्थ्यांसमोर घडल्यामुळे विद्यार्थ्यांनी मध्यस्थी करून शिक्षकेला कार्यालयात नेऊन तिला पाणी पाजले. संतप्त झालेल्या शिक्षकेने झालेला घटनेचा प्रकार शाळेचे मुख्याध्यापकांनी हा प्रकार संस्था चालकांच्या सांगितला आहे.
नेहमी शेरोशायरी आणि दमबाजी करणाऱ्या शिक्षकांनी चक्क माझ्यावर हात उचलल्या यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकेने थेट पोलीस स्टेशन गाठले व सदर शिक्षकाविरुद्ध मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे या घटनेमुळे संगमनेर तालुक्यातील शिक्षक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेमुळे शिक्षण क्षेत्रामध्ये अशा प्रकारचे लोक काम करतात की त्यांना समाजाचे भान सुद्धा राहिले नाही. अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात होत आहे. या घटनेचा पालक वर्ग मधून तीव्र निषेध नोंदवला गेला आहे.
Post a Comment