संगमनेर : शहरातील दोन मोठ्या मटका अड्ड्यांवर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाने कारवाई केली आहे. या छाप्यात ३५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. एकूण १० लाख ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या या कारवाईमुळे शहर पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही संशय निर्माण झाला आहे. पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपाधीक्षक संतोष खाडे यांच्यासह विशेष पथकाने शुक्रवारी (ता. २०) ही कारवाई केली.
शहरातील दोन ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून हे धाडसत्र राबवण्यात आले. या कारवाईत मटका चालवणाऱ्या अड्ड्यांवरून ३५ जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १०.४५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील अवैध धंदे थांबले असल्याचे वारंवार सांगणाऱ्या स्थानिक पोलिसांच्या भूमिकेवर कारवाईमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. यावर पोलिस अधीक्षक काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post a Comment