लाच घेताना गटविकास अधिकार्याला लाच घेताना पकडले...

अहिल्यानगर : सेवानिवृत्त ग्रामसेवकाकडून दहा हजार रुपयांची लाच स्वीकारताना राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे (वय ५७) यांना रंगेहाथ पकडले आहे. 


तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक असून त्यांच्यावर गटविकास अधिकारी राहुरी यांच्या अहवालावरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निलंबनाची कारवाई केली होती. 

त्यानंतर तक्रारदार हे सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या वरील दोषारोप पत्राचा अहवाल गट विकास अधिकारी यांनी पाठवायचा होता. तो अहवाल तक्रारदार यांच्या बाजूने पाठविण्याकरिता गटविकास अधिकाऱ्यांनी दहा हजार रुपयांची लाचेची मागणी केली. 

ही मागणी २० जून  रोजी केली होती. त्यानुसार तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावला. या सापळ्यात मुंडे लाच घेताना अहिल्यानगर शहरात सकाळी रंगेहात पकडण्यात आले. 

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरीक्षक छाया देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस नाईक चंद्रकांत काळे, पोलिस काॅन्स्टेबल सचिन सुद्रुक, अरुण शेख यांच्या पथकाने  केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post