कांद्याच्या भावात घसरण.. आवक टिकून... शेतकर्यांमध्ये नाराजी...

अहिल्यानगर : कांद्याच्या भावात मागील आठवड्यात वाढ झाली होती. कांद्यला सुमारे २२०० रिपयांपर्यंत कांद्याला प्रतिक्विंटल भाव मिळत होता. कांद्याच्या भावात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. शेतकर्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते.शेतकर्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही.  


अवघ्या पाच ते सहा दिवसात कांद्याच्या भावात घसरण झाली  आहे. ही घसरण सुरू झाल्याने शेतकर्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे. श्रीरामपूर, संगमनेर या बाजार समितबरोबरच नेप्ती, घोडेगाव व वांबोरी उपबाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले.

श्रीरामपूर येथील बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. एक नंबर कांद्याला १९०० रुपयांचा भाव मिळाला.  कांद्याच्या २००२८ गोण्यांची आवक झाली. कांद्याच्या प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव ः एक नंबर कांदा ः १५०० ते १९००, दोन नंबर कांदा ः १००० ते १४५०, तीन नंबर कांदा ः ५०० ते ९५०, गोल्टी कांदा ः १००० ते १४००, खाद ः २०० ते ४५०. 

मोकळा कांद्याचे लिलाव झाले. एकूण ६० वाहनातून कांद्याची आवक झाली. एक नंबर कांद्याला १२०० ते १५६०, दोन नंबर कांद्याला ः ९०० ते १२००, तीन नंबर कांद्याला ः ७०० ते ९००, गोल्टी कांद्याला १००० ते १३५०, खाद ः ५०० ते ७००.

संगमनेर  येथील बाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. तालुक्यातून कांद्याच्या ८५०८ गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला १७०१ रुपयांचा भाव मिळाला. 

कांद्याचे प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव ः सुपर गोळा माल ः १९५१ ते १९०१, एक नंबर कांदा ः १२५१ ते १७०१, दोन नंबर कांदा ः ८०० ते ११००, तीन नंबर कांदा ः ५०० ते ७००, चार नंबर कांदा ः २०० ते ४००.

राहुरी तालुक्यातील वांबोरी उपबाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. एक नंबर कांद्याला १९०० रुपयांचा भाव मिळाला. राहुरी तालुक्यासह शेजारील तालुक्यातून कांद्याच्या ६८७३ कांदा गोण्यांची आवक झाली. कांद्याचे प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव ः एक नंबर कांदा ः १४०५ ते १९००, दोन नंबर कांदा ः १००५ ते १४००, तीन नंबर कांदा ः २०० ते १०००, गोल्टी कांदा ः ६०० ते १०००.

अहिल्यानगर  येथील नेप्ती उपबाजार समितीत कांद्याचे लिलाव झाले. यामध्ये एक नंबर कांद्याला १८०० रुपयांचा भाव मिळाला. कांद्याच्या ४७७३६ कांदा गोण्यांची आवक झाली. 

कांद्याचे प्रतवारीनुसार प्रतिक्विंटलचे भाव ः एक नंबर कांदा ः १४०० ते १८००, दोन नंबर कांदा ः १००० ते १४००, तीन नंबर कांदा ः ५०० ते १०००, चार नंबर ः २५० ते ५००.

घोडेगाव  येथील उपबाजार समितीच्या आवारात कांद्याचे लिलाव झाले. एकूण ३७१ वाहनांतून कांद्याच्या ४२ हजार १३७ गोण्यांची आवक झाली. एक नंबर कांद्याला १८०० रुपयांचा भाव मिळाला. 

नेवासे तालुक्यासह शेजारील तालुक्यातून कांद्याची चांगली आवक झाली. कांद्याचे प्रतवारीनुसार भाव ः एक नंबर कांदा ः १७०० ते १८००, दोन नंबर कांदा ः १४०० ते १५००, तीन नंबर कांदा ः १२०० ते १३००, गोल्टा ः ८०० ते १०००, गोल्टी ः ६०० ते ७००, जोड कांदा ः २०० ते ५००. अपवादात्मक गोण्यांना १९०० ते २००० रुपयांचा प्रतिक्विंटलचा भाव मिळाला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post