श्रीरामपूर : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे हरित श्रीरामपूर व सुंदर श्रीरामपूर चे स्वप्न साकार करण्यासाठी शहराचे विविध भागांमध्ये वृक्षारोपण चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी नगरपालिकेची नेहमी सहकार्य राहील . नागरिकांनी जागा उपलब्ध करून दिल्यास किंवा दाखविल्यास त्या ठिकाणी वृक्षारोपण पालिकेतर्फे करण्यात येईल यासाठी शहरवासीयांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केले.
मानवता संदेश फाउंडेशन व अहेबाब ए मिल्लत ग्रुप तर्फे संघटनेचे अध्यक्ष तथा श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांचे साठाव्या वाढदिवसानिमित्त साठ वृक्षांचे वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शिंदे, श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप,श्रीरामपूर मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश रक्ताटे,मार्गदर्शक प्रदीप आहेर,नगरसेवक हाजी अंजुमभाई शेख,राजे अलघ,श्रीराम तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री.अशोक उपाध्ये,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्री तोफिक शेख,श्री सोहेल शेख,हाफिज अशपाक पठाण,आयाज तांबोळी,सर्वांचे वाढदिवस साजरे करणारे सर्वांचे मित्र लकी सेठी,शहर काजी मौलाना सय्यद अकबरअली वृक्ष चळवळीचे प्रमुख कार्यकर्ते डॉ.सलीम शेख,पेन्शनर शिक्षक संघटनेचे शहराध्यक्ष श्री प्रकाश माने आदींच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी मुख्याधिकारी घोलप बोलत होते.
ते पुढे म्हणाले की वृक्षारोपण हे एक सामाजिक कार्य समजून प्रत्येक नागरिकांनी वृक्षरोपणास प्रोत्साहन देण्याची गरज आहे.आपल्या घराच्या आसपास सुद्धा प्रत्येकाने वृक्षारोपण करावे पालिकेच्या संत गाडगेबाबा उद्यानामध्ये त्यासाठी मोफत रोपे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.याचा शहरवासीयांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
गेल्या वर्षी देखील मिळत नगर कॅनल साईडला ५० झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले होते त्यापैकी ३५ झाडे आज जगली आहेत.या वृक्षांचे संगोपन होण्यासाठी वर्षभर झाडांची निगा राखून त्यांना पाणी देणारे तन्वीर शेख,खालील मोमीन हाजी अनिस शेख,अन्वर टेलर आदींचा उपायुक्त शिंदे व मुख्याधिकारी घोलप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना नगरसेवक अंजुमभाई शेख यांनी वृक्षारोपण चळवळीसाठी मानवता संदेश फाउंडेशन व अहबाब ए मिल्लत ग्रुपने दिलेल्या योगदानाबद्दल कौतुक करून भविष्यातही मिल्लत नगर भागामध्ये असेच सामाजिक कार्य सुरू ठेवावे त्यासाठी आम्ही सर्वतोपरी सहकार्य करू असे सांगितले.
मालेगाव महानगरपालिकेचे उपायुक्त गणेश शिंदे यांनी श्रीरामपूरचे मुख्याधिकारी असताना केलेल्या बहुमोल कामगिरीचा उल्लेख करून ज्येष्ठ पत्रकार सलीमखान पठाण यांनी त्यांना धन्यवाद दिले.
कार्यक्रमास उपस्थित अहेबाब ए मिल्लत ग्रुपचे सदस्य सर्वश्री हाजी इमाम सय्यद सर,हाजी अनिस शेख सर,सज्जाद हुसेन नवाब,सलीम रसूल पटेल,रिटायर्ड पीएसआय जाबीरभाई सय्यद,पंचायत समितीचे साधन व्यक्ती शाहीन शेख सर,प्राध्यापक मोहम्मद उमर बागवान सर, या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेणारे मानवता संदेश फाउंडेशनचे सर्वश्री तनवीरभाई शेख,खालीद मोमीन,बुरहानभाई जमादार,साजिद गुल मोहम्मद शेख,मुख्याध्यापक संघाचे तालुका अध्यक्ष जाकीर हुसेन सर,रज्जाकभाई पठाण, दीपक कदम,फिरोजखान पठाण सर,मोहम्मद आसिफ मुर्तुजा सर व इतर अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत वृक्षांचे रोपण करण्यात आले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बुरहानभाई जमादार, तन्वीर शेख,खालीद मोमीन यांनी विशेष परिश्रम घेतले.डॉ. सलीम शेख यांनी सर्वांचे आभार मानले.
या वृक्षारोपण मोहिमेचा भाग म्हणून मिल्लत नगर पूल ते नवीन ठाकूर हॉस्पिटल पर्यंतच्या भागांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार आहे अशी माहिती याप्रसंगी देण्यात आली.
Post a Comment