विभागीय आयुक्तांचे बीएलओ च्या कामातून शिक्षकांना वगळण्याचे निर्देश

अहिल्यानगर : शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ ) या निवडणूक विषयक निरंतर चालणाऱ्या अशैक्षणिक कामातून पूर्णपणे वगळण्याबाबतचे निवेदन विभागीय आयुक्त नाशिक यांना अखिल महाराष्ट्र प्राथमिक  शिक्षक संघाने २४ जून २०२५ रोजी दिले होते .याच निवेदनानुसार विभागीय आयुक्तांनी २५ सप्टेंबर २०२५ रोजी नाशिक,धुळे,जळगाव,अहिल्यानगर व नंदुरबार या जिल्हाधिकारी यांना संबंधित शासन निर्णयानुसार कार्यवाही करण्याचे निर्देश दिल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे यांनी दिली. 


विभागीय आयुक्त नाशिक यांनी दिलेल्या निर्देशात म्हटले आहे की अहिल्यानगर जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांना कळविले नुसार शिक्षकांना मतदान केंद्रस्तरीय अधिकारी( बीएलओ)या निवडणूक विषयक निरंतर चालणाऱ्या अशैक्षणिक कामातून पूर्णपणे वगळल्याबाबत योग्य ती कार्यवाही करणे कामी शासन निर्णय २३ऑगस्ट २०२४ मधील निर्देशानुसार कार्यवाही करणे संदर्भात निर्देश आहेत . त्यानुसार धुळे,जळगाव,नंदुरबार व नाशिक या जिल्ह्यांमध्ये सदर शासन निर्णय नुसार योग्य ती कार्यवाही होणे कामी संबंधित जिल्ह्यातील जिल्हाधिकारी व निवडणूक निर्णय अधिकारी यांना निर्देश होणे बाबत या कार्यालयाला विनंती करण्यात आलेली होती.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार बीएलओचे हे काम अशैक्षणिक म्हणून जाहीर केल्यामुळे शिक्षकांना बीएलओ हे काम बंधनकारक नसून या कामातून त्यांना पूर्णपणे मुक्ती मिळणार असून या शासन निर्णयाचे उल्लंघन करून स्थानिक इतर कर्मचाऱ्यांऐवजी केवळ शिक्षकांनाच बीएलओ चे आदेश देणाऱ्या महसूल अधिकाऱ्यां विरोधात मुख्य निवडणूक अधिकारी , मुंबई यांचेकडेस अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे राज्यकार्याध्यक्ष तथा अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष देविदास बस्वदे,राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे,राज्य वरिष्ठउपाध्यक्ष किरण पाटील, राज्य संयुक्तसचिव राजेंद्र निमसे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळामार्फत रीतसर तक्रार दाखल करण्यात येईल, असे श्री निमसे यांनी सांगितले.

राज्यसंघटक बाळासाहेब कदम,संघाचे जिल्हाध्यक्ष शरद वांढेकर ,जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे, ऐक्यमंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप चक्रनारायण ,जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले,उच्चाधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद आव्हाड,शिवाजी ढाकणे,दत्तात्रय परहर,संजय शेळके,विलास लवांडे,सुधीर बोऱ्हाडे,जिल्हा नेते विष्णू बांगर,संजय शेळके,डीसीपीएस चे जिल्हाध्यक्ष संदीप भालेराव,पदवीधरचे जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद ,जिल्हानेते राजकुमार शहाणे,संघाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर रणदिवे,मधुकर डहाळे,विलास लवांडे, महेश लोखंडे,ज्ञानदेव कराड 

,प्रकाश पटेकर,भाऊसाहेब घोरपडे, नितीन थोरात ,बजरंग बांदल,संभाजी तुपेरे,महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनिता उदबत्ते,जिल्हा सरचिटणीस संगीता घोडके,बँकेच्या माजी संचालिका संगीता निमसे,जिल्हा संयुक्तचिटणीस मनिषा क्षेत्रे ,संगीता निगळे ,नगर तालुका महिला आघाडी अध्यक्ष सविता नागरे ,नगर संघाचे तालुकाध्यक्ष पांडुरंग देवकर ,पारनेर संघाचे अध्यक्ष लक्ष्मण चेमटे,पाथर्डी संघाचे अध्यक्ष भारत शिरसाठ, पाथर्डी ऐकय मंडळ अध्यक्ष संदिप काळे,ऐक्य मंडळाचे पारनेर तालुकाध्यक्ष संतोष ठाणगे, केंद्रप्रमुख संघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र अनाप ,सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष संदीप शेळके, सुनिल कदम,जनार्दन काळे,ज्ञानदेव कराड,प्रताप कदम , बथूवेल हिवाळे ,उद्धव डमाळे ,नंदू गायकवाड,शिवाजी माने,सुखदेव डेंगळे ,बंडू नागरगोजे,लक्ष्मण जटाडे , बबन देशमुख,राजेंद्र सोनवणे , शहाजी जरे,प्रदीप कांबळे,विनायक गोरे,अशोक दहिफळे,प्रविण शेळके,रविंद्र दरेकर,संजय कांबळे,वर्षा शिरसाठ,शितल ससे , आदिनाथ पोटे,राजेंद्र गांगर्डे,विशाल कुलट,राहुल व्यवहारे,अमोल मुरकुटे,प्रविण खाडे,आदिल शेख, संजय थोरात,भाऊसाहेब घोरपडे , सर्जेराव ससाणे यांनी केले आहे .

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post