राहुरी विद्यापीठ : नवी दिल्ली, पुसा येथील राष्ट्रीय कृषि विज्ञान परिसरात देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शेतकर्यांसाठी 42 हजार कोटींहून अधिक कृषि योजनांचा लोकार्पन सोहळा पार पडला.
यावेळी देशाचे कृषि मंत्री शिवाराजसिंग चौहान, राज्यकृषि मंत्री भागीरथ चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचेे कुलगुरु डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विस्तार शिक्षण संचालक डॉॅ. गोरक्ष ससाणे यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे ऑनलाईन प्रक्षेपन विद्यापीठात करण्यात आले.
याप्रसंगी कृषि तंत्रज्ञान शिक्षणाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके, वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख डॉ. विजू अमोलिक, मृदाशास्त्र व कृषि रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. भिमराव कांबळे, कृषि अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र हिले, कृषि प्रक्रिया अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. कैलास कांबळे, आंतरविद्याशाखा जलसिंचन विभाग प्रमुख डॉ. विजयकुमार पाटील, जीवरसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. प्रकाश लोखंडे, प्रमुख शास्त्रज्ञ बियाणे डॉ. नितीन दानवले व कापूस सुधार प्रकल्पाचे प्रमुख डॉ. पवन कुलवाल उपस्थित होते.
याप्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे म्हणाले शेतकर्यांच्या प्रगती आणि समृध्दीसाठी देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी 40 हजार कोटींहून अधिक खर्चाच्या योजनांची भेट शेतकर्यांना आज दिली आहे. यामुळे खर्या अर्थाने शेतकर्यांचा सन्मान झाला आहे.
प्रधानमंत्री धनधान्य योजनेमुळे पिकांचे सरासरी उत्पादन व शेतकर्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल आणि कडधान्य अभियानामुळे देश कडधान्यात स्वयंपूर्ण होइल.
यावेळी डॉ. प्रशांत बोडके, डॉ. सुरेश दोडके, डॉ. विजू अमोलिक आणि डॉ. उल्हास सुर्वे यांनी एकात्तिक शेती पध्दती, कडधान्य व्यवस्थापन, रब्बी पीक व्यवस्थापन, सेंद्रिय शेतीतील एकात्मिक पीक व्यवस्थापन या विषयांवर यावेळी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते प्रातेनिधीक स्वरुपात प्रगतशील महिला शेतकरी निर्मला गाढे, प्रगतशील शेतकरी व माजी सैनिक संदीप म्हसे, ताराचंद गागरे यांचा कृषिदर्शनी देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी नवी दिल्लीवरुन प्रक्षेपीत होणार्या अन्नदाताओंका सन्मार, समृध्द राष्ट्रका निर्माण हा कार्यक्रम झाल्यानंतर शेतकर्यांनी शास्त्रज्ञांबरोबर सुसंवाद साधला.
यावेळी शास्त्रज्ञ, शेतकरी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. भगवान देशमुख यांनी मानले.

Post a Comment