जिल्हा बँक निवडणुकीत कर्डिले, पिसाळ, शेळके व गायकवाड विजयी



नगर : जिल्हा बँकेच्या 21 जागांपैकी 17 जागा बिनविरोध झालेल्या आहेत..त्यातील चार जागांसाठी शनिवारी (दि. 20)ला मतदान झाले होते. आज शनिवारी सकाळी नऊ वाजता मतमोजणी झाली. यामध्ये पारनेरमधून उदय शेळके, नगरमधून शिवाजी कर्डिले व कर्जतमधून अंबादास पिसाळव व बिगरशेती मतदारसंघातून प्रशांत गायकवाड विजयी झाले.

जिल्हा बँकेच्या चार जागांसाठी शनिवारी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर आज रविवारी मतमोजणी प्रक्रिया पार पडली. 

सेवासोसायटी मतदार संघाची मतमोजणी झाल्यानंतर बिगर शेती मतदार संघाची मतमोजणी सुरु झाली. या मतदार संघातील लढत सभापती प्रशांत गायकवाड व दत्तात्रय पानसरे चुरशीची झाली. यामध्ये प्रशांत गायकवाड विजयी झाले आहेत. सेवा सोसायटी मतदार संघात माजी आमदार शिवाजी कर्डिले, उदय शेळके व अंबादास पिसाळ विजयी झालेले आहेत

बिनविरोध निवडून आलेले संचालक

सिताराम कोंडाजी गायकर

अमोल जगन्नाथ राळेभात

विवेक बिपीनदादा कोल्हे

शंकरराव यशवंतराव गडाख

मोनिका राजीव राजळे

आण्णासाहेब सारंगधर म्हस्के

अरुण बाबुराव तनपुरे

चंद्रशेखर मारुतराव घुले पाटील

माधवराव सावळेराम कानवडे

राहुल कुंडलिकराव जगताप

भानुदास काशिनाथ मुरकुटे

आशुतोष अशोकराव काळे 

अमित अशोक भांगरे 

करण जयंतराव ससाणे 

गणपतराव पुंजाजी सांगळे

अनुराधा राजेंद्र नागवडे 

आशा काकासाहेब तापकीर 

आज निवडून आलेले

 शिवाजीराव कर्डीले

 आंबदास पिसाळ

 प्रशांत गायकवाड

उदय शेळके

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post