नेवासा : नगर-औरंगाबाद राज्य महामार्गावरून औरंगाबादकडे जाणार्या मालमोटारचालकाला उस्थळ दुमाला शिवारात (ता.नेवासा) येथे लुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शहाबुद्दीन गुलामवारीस मोहम्मद (वय 21 वर्ष, धंदा - चालक रा. गौरीगंज, ता. गौरागंज जि. अमेठी राज्य- उत्तरप्रदेश) यांनी नेवासा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, मी एस. टी. सी. ट्रान्सपोर्ट दिल्ली येथे संजय कुमार (रा. दिल्ली) यांचे मालकीचे मालमोटारीवर चालक म्हणून काम करतो. माझ्या सोबत ट्रकमधे रिझवान हा किलीनर म्हणून नेहमी असतो.
19 रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास एस. टी. सी. ट्रान्सपोर्ट मुंबई येथून मालमोटारीमध्ये फ्रुट भरुन रांची राज्य झारखंड येथे जाण्याकरीता पुणे, नगरमार्गे जात होतो. 20 रोजी मध्यरात्री एक वाजता नगर- औरंगाबाद रस्त्याने जात असताना उस्थळ दुमाला शिवारत (ता. नेवासा ) दुचाकीस्वारांना दुचाकी मालमोटारीला आडवी लावून शिविगाळ करीत मालमोटारीच्या काचा फोडल्या. त्यानंतर एकाने चाकूचा धाक दाखवून खिशात हात घालून 12 हजार 500 रुपये चोरून नेले.
याबाबत नेवासा पोलिस ठाण्यात रस्ता लुटीची घटनेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Post a Comment