नगर : एटीएम कार्डची आदलाबदल करून एका वृद्धाला 48 हजाराला गंडा घातला गेला. स्टेट बँकेच्या सावेडी शाखेतील एटीएम समोर हा प्रकार घडला.
विजय श्रावण कांबळे (वय 50 रा. तपोवन रोड, नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सावेडीतील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले होते. पैसे काढताना अडचण आल्याने तेथे असलेल्या एका अनोळखी इसमाने याचा फायदा घेत फिर्यादीकडून त्यांचे एटीएम कार्ड घेत त्यांना दुसरे एटीएम कार्ड दिले.
यानंतर त्या इसमाने फिर्यादी यांच्या एटीएमचा उपयोग करून खात्यामधून 48 हजार काढून घेतले. याप्रकरणी पुढील तपास पोलिस हवालदार डी. बी. जपे करीत आहेत.
Post a Comment