नगर : चांदेकासारे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक विलास नारायण शिंदे यांचा ग्रामपंचायत निवडणुकीत कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला. या शिक्षकाच्या कुटुंबियांना शासनाची तातडीने मदत करावी, अशी मागणी शिक्षक परिषदेच्या प्राथमिक विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी ग्रामपंचायत विभागाच्या निवडणुक निर्णय अधिकारी उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांच्याकडे केली आहे.
याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, विलास शिंदे यांची
बायपास सर्जरी झाली असतानाही ग्रामपंचायतीच्या निवडणूककामी त्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक केली होती. मतदानाच्या दिवशीच त्यांना ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला होता. त्यानंतर उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. निवडणूक कामी नियुक्तीवर असल्यामुळे शासनाकडून त्यांच्या कुटूंबियांना तातडीने आर्थिक शासन आदेशानुसार मदत मिळावी या अशी मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.
याप्रसंगी संजय शिंदे,सुभाष गरूड, गोकूळ झावरे, संजय दळवी, गणेश वाघ,दिपक झावरे आदी उपस्थित होते.
यावेळी चर्चा करताना उपजिल्हाधिकारी उर्मिला पाटील यांनी, याबाबतचा प्रस्ताव आमच्या कार्यालयाकडून तत्काळ तयार करुण राज्याच्या ग्रामविकास विभागाला सादर केला जाईल, असे आश्वासन पाटील यांनी ठुबे यांना दिले.
दरम्यान या शिंदे यांना शासनाकडून तातडीने आर्थिक मदत मिळावी, यासाठी ठुबे यांनी मुख्यमंत्री ,उपमुखमंत्री कार्यालय व ग्रामविकास विभागाकडेही पत्रव्यवहार केला आहे.
Post a Comment