पारनेर ः रुग्णाला उपचाराबराेबरच जर मायेचा आधार मिळाला तर रुग्ण लवकर बरा हाेत असताे. आैषधे कमी पण मायेच्या आधाराने निम्मा रुग्ण बरा हाेताे. असाच मायेचा आधार पारनेर तालुक्यातील कै. काॅ. बाबसाहेब ठुबे काेविड सेंटरमध्ये काेराेना बाधितांना मिळत आहे. त्यामुळे येथील रुग्ण लवकर बरे हाेऊन घरी परत आहे.
कान्हूर परिसरात काेराेनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रुग्णांना बेडसाठी खूप धावपळ करावी लागत हाेती. आपल्या गटातील व परिसरातील रुग्णंची साेय व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अॅड. आझाद ठुबे यांनी कै. काॅ. बाबासाहेब ठुबे काेविड सेंटर सुरु केलेले आहे. या काेविड सेंटरमुळे रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना चांगलाच आधार मिळालेला आहे.
या काेविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना आैषधाेपचाराबराेबर त्यांच्याकडून व्यायाम करून घेतला जात आहे. तसेच सर्वच रुग्णांना येथे पाैष्टिक आहार देण्याचे काम अॅड. आझाद ठुबे करीत आहे. विशेष म्हणजे ते रुग्णांना घरातील व्यक्ती समजूनच त्यांची व्यवस्था करीत आहे.
काेराेनाची बाधा झाल्यानंतर या काेविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांच्या प्रत्येक सुख -दुःखाच्या प्रसंगात अॅड. ठुबे व त्यांचे सहकारी सहभागी हाेत आहे. या काेविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या एका मुलाचा वाढदिवस हाेता. ताे कसा साजरा हाेणार असा त्या मुलाला प्रश्न हाेता. मात्र काेविड सेंटरमध्ये केक आणून त्याचा वाढदिवस या काेविड सेंटरमध्ये साजरा करण्यात आलेला आहे. त्यामुळे त्या मुलांचा आनंद गणगणात मावतन नव्हता.
हे काेविड सेंटर नव्हे तर आम्हाला आमचे घरच वाटत अाहे, अशी प्रतिक्रिया या काेविड सेंटरमधून घरी जाताना रुग्ण व त्यांचे नातेवाईक देत आहेत.
Post a Comment