केडगावला शिवसेनेच्या पाठपुराव्याला यश... आणखी एक लसीकरण केंद्र सुरु

नगर ः शहरासह उपनगरात असलेल्या लसीकरण केंद्रावर कोरोना लस घेण्यासाठी नागरिकांची गर्दी कमी होऊन लसीकरणाचे योग्य नियोजन करण्यासाठी शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांच्या पाठपुरावा केला. त्यामुळे केडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. यामुळे एकाच केंद्रावर होणारी गर्दी कमी होऊन नागरिकांचे लसीकरण होत आहे.

नव्याने सुरु झालेल्या लसीकरण केंद्राची शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी पहाणी केली. यावेळी नगरसेवक अमोल येवले, संग्राम कोतकर, विजय पठारे, डॉ. गिरीष दळवी, सुनील सातपुते, विशाल वालकर, आशासेविका अश्विनी पाटील, नीलम पारखे, कल्पना जोशी, सीता शेळके आदी उपस्थित होते.

शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते म्हणाले की, महापालिका लसीकरण कार्यक्रमात फोल ठरली आहे. नियोजनाचा बोजवारा उडाला आहे. लसीकरण गर्दीवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची हेळसांड होत आहे. 
 
लसीकरण केंद्र वाढविण्यास विनंती केली असता, भूषणनगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत लसीकरण केंद्र सुरु करण्यात आले आहे. लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. शहरात टप्प्याटप्प्याने दहा लसीकरण केंद्र सुरु करण्याची मागणी देखील शिवसेनेच्या वतीने करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post