संगमनेर : राज्यात लवकरच मोसमी पावसाचे आगमन होणार आहे. शेतकऱ्यांना वेळेत युरिया उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी क्रांतीसेनेचे नेते बाळासाहेब भोर यांनी केली आहे.
याबाबत भोर यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खरीप हंगामासाठी बाजरी, सोयाबीन, मका, कपाशी, भुईमूग, तूर या पिकांसाठी शेतकरी महागाईचा विचार करता इतर खतांच्या तुलनेत युरियालाच जास्त प्राधान्य देत असतो. परंतु कृषी विभागाच्या नियोजनाअभावी मागील खरिपाच्या हंगामातही शेतकऱ्यांना वेळेत युरिया उपलब्ध झाला नाही. या वर्षी देखील तीच परिस्थिती आहे. परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे.
https://www.tejwarta.com/2021/05/Meeting.html
काही ठिकाणी 270 रुपये किंमतीची गोण 400 रुपये दिल्यावर कशी काय उपलब्ध होते? असा सवाल भोर यांनी केला आहे.
साठेबाजी हे यासाठी प्रमुख कारण आहे. असा काळाबाजार करणाऱ्यांवर कृषी विभागाने नियंत्रण ठेवले पाहिजे. काही ठिकाणी युरिया असून सुद्धा शेतकऱ्यांना युरियाबरोबर जोड म्हणून दुसऱ्या दाणेदार खताची गोण घ्या तरच युरिया मिळेल अशा प्रकारची अडवणूक सुरू आहे. काही शेतकऱ्यांना नाविलाजास्तव गरज नसतानाही दोन्ही गोण्या घ्याव्या लागतात, असे भोर यांनी निवेदनात म्हटले आहे.
Post a Comment