राहुरी : जन्मदात्या आईलाच मुलाने बेघर केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राहुरी मध्ये ती वृध्द महिला आपला मुलगा व नातू अन् सुनाबरोबर एकाच घरात राहत होते. मार्च महिन्यात किरकोळ कारणावरून मुलगा व आईमध्ये भांडण झाले. या रागाच्या भरातच मुलाने आईला घराबाहेर काढून दिले.
तेव्हापासून ती वृध्द महिला घराबाहेर राहून आपला उदरनिर्वाह करीत आहे. या वृध्द महिलेने राहुरी पोलिस ठाण्यात आपल्या मुलाच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Post a Comment