नगर : कोविड सेंटरमध्ये कोरोनाबाधितांबरोबरच लोकप्रतिनिधी डान्स करून त्याचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल करू लागले आहे. या प्रकाराने सर्वसामान्य यांमधून आता नाराजी व्यक्त केली जात आहे.
आमदार रोहित पवार यांनी कर्जतमधील कोविड सेंटरला भेट दिली. त्यावरून त्यांच्यावर चांगलीच टीका होत आहे. भाजपाचे खासदार डॉ. सुजय विखे यांनीही या डान्स पध्दतीवर टीका केली आहे.
मी स्वत: न्यूरो सर्जन आहे. आजपर्यंत वैदकीय क्षेत्रात अनेक प्रकारचे उपचार पाहिले. मात्र कोरोनावर सध्या काही ठिकाणी सुरु असलेली डान्सची पध्दत माझ्या मनाला भावली. अशा प्रकारे रुग्ण बरे होणार असतील तर त्याचा नक्कीच वापर करावा लाहे, अशा शब्दात खासदार डॉ. सुजय विखे यांनी आमदार नीलेश लंके व आमदार रोहित पवार यांचे नाव न घेता लगावला.
कोविड सेंटरमध्ये रुग्णांचे मनोरंजन होणे गरजेचे आहे. मात्र लोकप्रतिनिधींनी डान्स करणे चुकीचे आहे. हे प्रत्येकाने ओळखणे गरजेचे आहे.
Post a Comment