सचिन पाटील
नगर : सध्या जिल्ह्यासह राज्यात गेल्या काही दिवसांपासून हनी ट्रपचे गुन्हे घडत असल्याचे समोर येऊ लागले आहे. त्यातील काही उघड होत असून काही तसेच राहत असल्याने काहीजण लुटले जात आहे. हे गुन्हे उघड झाल्यानंतर लोक कसे जाळ्यात ओढले जातात, याबाबत जनजागृती झाल्यास असे प्रकार घडणार नाही. याबाबत आता विचार करून पाऊले टाकणे गरजेचे आहे.
हनी ट्रपचे गुन्हे कमी होण्याऐवजी आता वाढत चालले आहेत. हे गुन्हे कसे घडतात, त्याला कोण जबाबदार हा विचार गुन्हा घडल्यानंतर सुरु होत आहे. त्यावर अनेकदा असा एखादा प्रकार घडल्यानंतर चर्चा होते. परंतु एखादी घटना घडल्यानंतर तिची पुनर्रावृत्ती पुन्हा होऊ नये, यासाठी मात्र कुठलीच उपाययोदना आपल्याकडे केली जात नसल्यानेच असे प्रकार घडत आहे.
एखाद्या ठिकाणी वारंवार अपघात होत असतील तर त्या भागात अपघात ग्रस्त भाग म्हणून सूचना फलक लावून समाज प्रबोधनाचे काम केले जाते. तसेच काहीसे काम आता पोलिस प्रशासनासह सामाजिक संघटनांना हाती घेऊन हनी ट्रपच्या गुन्ह्यात पुन्हा कोणी अडकू नये, यासाठी आता पुढे येण्याची गरज निर्माण झालेली आहे.
त्याबरोबर जे अशा प्रकरणात अडकलेले आहेत. त्यांनीही समाजाची भीती न बाळगता पुढे येऊन तक्रारी केल्यानंतर पोलिस प्रशासनाला त्याची पाळेमुळे उखडून टाकण्यास मदत होणार आहे. आपल्याकडून चूक झाली म्हणून ती झाकून टाकण्याचा कितीही प्रयत्न झाला तरी ती समाजापुढे झाकली गेली तरी मनात झाकली जात नाही. ती सदैव मनात रहात असते. तसेच समाजातील काही घटकांनाही ती माहिती झालेली असते. त्यामुळे चूक झालेली आहे. समाज काय म्हणेल यापेक्षा आपल्या सारखा पुन्हा एखादा अडकून त्याचा बळी जाऊ नये, यासाठी आता पुढाकार घेणे गरजेचे आहे.
हनी ट्रप का होतात... अशा मोहजाळात नेमके लोक का अडकतात? याचा बारकाईने अभ्यास करून तो समाजासमोर मांडणे गरजेचे आहे. हे करताना संबंधितांची ओळख पटणार नाही, याचे भान ठेऊन त्यावर काम करावे लागणार आहे. जनजागृती करताना कोणाची बेअब्रू होणेही टाळावे लागणार आहे.
म्हतारी मेल्याचे दु:ख नाही पण काळ सोकावला नाही पाहिजे. या म्हणी प्रमाणे हे गुन्हे समाजात कितीही प्रबोध केले तरी कोठे ना कोठे घडणार आहे. पण गुन्हे घडूनही गप्प राहणे चुकीचे आहे. त्यावर चर्चा करून असे प्रकार पुन्हा घडू नये, यासाठी सामाजिक भानही ठेवणे आता गरजेचे आहे.
Post a Comment