नगर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. तो रोखण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहे. सध्या जनता कर्फ्यू लागू करण्यात आलेला आहे. या काळात नागरिक घरात राहत असून दुकाने बंद ठेवण्यात आलेले आहेत. याच काळात काहींनी पैसा कमाविण्याचा प्रयत्न सुरु केलेला आहे. थुकणीची पुडी व फुकणी सध्या महागला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. या काळात सर्व दुकाने बंद ठेवण्यात आलेली आहे. त्यामुळे व्यसने करणार्यांची चांगलीच पंचाईत झालेली आहे. दुकाने बंद असल्याने शिगारेट व तंबाखू मिळणे अवघड झालेले आहे. काहींनी याच संधीचा फायदा उठविण्यास सुरवात केलेली आहे.
पूर्वी दहा ते 15 रुपयांना मिळणारी शिगारेट आता 25 ते 30 रुपयांना विकली जात आहे. तिच परिस्थिती तंबाखूच्या बाबतीत घडली आहे. दहा रुपयांची तंबाखूची पुडीही महागला असून 20 ते 25 रुपयांना मिळत आहे.
दिवसभर घरात बसून अनेकजण त्रस्त झालेले आहेत. त्यातच अनेकांना जडलेल्या व्यसनाच्या वस्तूही महागलेल्या आहे. विशेष म्हणजे जनता कर्फ्यूतही या वस्तू राजरोसपणे विकल्या जात आहे. विशेष म्हणजे अत्यावश्यक सेवेच्या वाहनांमध्येच या वस्तू आणून विक्री केल्या जात आहे. यामध्ये दुधाच्या वाहनांचा सर्वाधिक वापर केला जात आहे.
Post a Comment