कुकडीचा तिढा कधी सुटणार....


अमर छत्तीसे

श्रीगाेंदा ः कुकडीच्या पाण्यासाठी श्रीगाेंदा, कर्जत, पारनेर तालुक्याला दरवर्षीच संघर्ष करावा लागत आहे. यामुळे शेतकर्यांचे नुकसान हाेत आहे. हा प्रश्न तातडीने मार्गी लागणे गरजेचेे आहे.  त्यासाठी सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे.
दरवर्षीच कुकडीच्या आवर्तनावरून संघर्ष हाेत असताे. कुकडीच्या पाण्यासाठी हा संघर्ष नित्याचा ठरलेला आहे. नगर जिल्हयासाठी असलेल्या पाण्यावर नेहमीच पुणेकरांचा डाेळा राहिलेला आहे. पुण्याला आवर्तनात सर्वाधिक झुकते माप दिले जात आहे. 

वर्षानुवर्षे हेच चालत आलेले आहे. हे काेठेतरी थांबणे गरजेचे आहे. यासाठी जिल्ह्यातील विशेष करून कर्जत, जामखेड, पारनेर तालुक्यातील राजकीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. परंतु या तालुक्यातील नेते मंडळी एकमेकांवर आराेप ठेऊन आपण किती पाण्यासाठी प्रयत्न करताे हे दाखविण्यात सध्या दंग आहे.

नेहमी प्रमाणे यंदाही कुकडीचे आवर्तन उशिरा सुटले. यामध्ये शेतकर्य़ांचे माेठे नुकसान झाले आहे. परंतु आवर्तन आपलयाच मुळे सुटले असा टेंभा काहीजण मिरवित आहे. त्यात शेतकऱयांच्या झालेल्या नुकसानीवर एकही नेता बाेलायला तयार नाही. त्यामुळे शेतकऱयांमधून सध्या नाराजी व्यक्त केली जात आहे. नेत्यांनी आपली टिमकी वाजवून घेण्यापेक्षा शेतकरी हिताचे निर्णय घेण गरजेचे आहे. परंतु तसे हाेत नाही.

कुकडीचे आगामी आवर्तन वेळेत व पूर्ण क्षमतेने कायम स्वरुपी मिळावे, त्याचे नियाेजन हाेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी एकत्र येत ताेडगा काढण गरजेचे आहे. त्यासाठी आता या तीनही तालुक्यातील ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. तर हा प्रश्न कायमस्वरुपी सुटणार आहे. 

राजकीय कुरघाेडया करण्यासाठी निवडणुका असून त्यात एकमेकांवर कुरघाेड्या करत नेत्यांनी बसावे. परंतु कुकडीच्या पाण्यावर काेणी राजकारण करू नये. ज्यांना कुकडीच्या पाण्यावर राजकारण करायचे आहे. त्यांना शेतकरी आगामी निवडणुकांमध्ये धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, अशी चर्चा सध्या शेतकरयांमध्ये सुरु आहे. 


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post