अमर छत्तीसे
श्रीगोंदा : कुकडीच्या आवर्तनाकडे श्रीगोंदा तालुक्यातील शेतकरी चातक पक्षासारखी वाट पाहत होता. पण राजकीय सुंदोपसुंदी व न्यायालयीन बाबींमुळे आवर्तन सुटण्यास उशीर झाला होता. त्यामुळे फळबागा व इतर पिके जळून जाण्याच्या मार्गावर होती. पण आज मेघराजाने सर्वदूर हजेरी लावली. त्यामुळे बळीराजा सुखावला आहे.
कुकडीच्या आवर्तनाचा प्रत्येकवर्षी विषय अडचणीचा ठरतो. कोणी न्यायालयात जातो तर कधी राजकीय अनास्थेमुळे आवर्तन लांबणीवर पडते. पण हा संघर्ष श्रीगोंदा, कर्जत, पारनेर व करमाळा या तालुक्यात सर्वात जास्त श्रीगोंद्याच्या वाटेला येत असतो. त्यामुळे हा कुकडीचा प्रश्न कधी निकाली निघणार, असा सवाल आता शेतकर्यांमधून उपस्थित केला जात आहे.
आजच्या मेघराजाच्या आगमनाने "कुकडीने मारले अन् पावसाने तारले" अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. कुकडीच्या पाण्याचा तिढा सुटणे गरजेचे आहे. त्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कुकडीचे आवर्तन सुटण्यास उशिर झाल्याने सर्वच तालुक्यातील शेतकर्यांचे नुकसान झालेले आहे. आता आवर्तन सोडण्यात आलेले आहे. त्यातच पाऊस तालुक्यात होत आहे. त्यामुळे आताचे आवर्तनाचा फायद्यापेक्षा तोटाच झालेला आहे. त्यापेक्षा पावसाचा चांगला फायदा शेतकर्यांना झाला आहे.
Post a Comment