श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पातुन शेतीसाठी आवर्तन सोडणे गरजेचे होते म्हणून कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत नऊ मेला आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला होता. पण या निर्णयाच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली होती. ती याचिका आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मध्यस्थीने माघारी घेण्यात आल्यामुळे आवर्तनाचा मार्ग मोकळा झाला आहे. दि 20पासून आवर्तन सुरू होणार असल्यामुळे शेतीला फायदा होणार आहे.
कुकडीच्या आवर्तनाचा विषय गेल्या 15दिवसापासून चर्चेत होता. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत नऊ मे ला आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
या निर्णयाला आव्हान देणारी याचिका जुन्नर तालुक्यातील औटी नावाच्या शेतकऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यामुळे आवर्तन लांबणीवर पडले होते मागील आठवड्यात श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते कर्जत जामखेड चे आ रोहित पवार व आमदार बेनके यांनी मंत्रालयात जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेशी चर्चा करून शेतीसाठी आवर्तन किती गरजेचे आहे. त्यामुळे दाखल याचिका मागे घेण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली होती. त्यावेळी स्वत: मंत्री पाटील यांनी याचिकाकर्त्यांशी चर्चा करुन आश्वासन दिले होते. याचिका मागे घेण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार आज उच्च न्यायालयात याचिकाकर्त्यांनी आपली याचिका मागे घेतली. त्यामुळे आवर्तनाचा मार्ग मोकळा झाला.
दरम्यानच्या काळात श्रीगोंद्यातील काही नेतेमंडळींनी प्रतिआव्हान याचिका दाखल केल्या होत्या. पण त्यावर सुनावणी होण्यापूर्वी मुख्य याचिकाकर्त्यांनी आपली याचिका मागे घेतली.
आजच्या आवर्तनाच्या निर्णयामुळे शेतकरयांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. पण आजच्या निर्णयाचे श्रेय घेण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांमध्ये ओढाचढ सुरू झाली आहे. पण हे आवर्तन अकरा दिवस उशीरा सुटले नाही. यावर मात्र कोणीच काही बोलायला तयार नाही. यानुकसानीचे श्रेयही कोणी तरी घ्यावे, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Post a Comment