नगर : प्राथमिक शिक्षक परिषदेने पुकारलेले आंदोलन मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी, जिल्हा आरोग्याधिकारी यांनी ज्येष्ठ नेते रावसाहेब रोहोकले यांना आंदोलन मागे घेण्याच्या केलेल्या विनंतीचा व सूचनेचा मान ठेवून संघटना हे आंदोलन स्थगित केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन उपजिल्हाधिकारी संदिप निचित साहेब यांनी उचित पाउल उचलून संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे यांना लिखीत पत्र दिले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 17 एप्रिलला व्हीसीमध्ये सर्व तालुक्याचे तहसीलदार तसेच गटविकास अधिकारी व सर्व तालुका आरोग्याधिकारी यांना सूचना निर्गमीत केल्या आहेत की, जे कोविड कामे करणारे प्राथमिक शिक्षक लसीकरणासाठी येतील. त्यांना रांगेत उभे न करता प्राधान्याने लस उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे शिक्षक परिषदेची आंदोलनातील प्रमुख मागणी मंजूर झाली आहे.
याबाबत जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्य अधिकारी परीक्षित यादव, प्राथमिकचे शिक्षणाधिकारी गुलाब सय्यद यांच्या समवेत यशस्वी चर्चा झाली.
यावेळी परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रविण ठुबे, गुरुमाऊलीचे जिल्हाध्यक्ष विकास डावखरे, विकास मंडळ नेते संजय शिंदे आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यावेळी स्पष्टपणे केले की, ज्या शिक्षकांना कोविड संदर्भातील कोणत्याही प्रकारची कामे आहेत. त्यांना रांगेत उभे न करता प्राधान्याने लसीकरण सर्व पीएचसीमध्ये करण्यात यावे. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आपणास प्राधान्याने लस दिली जाणार नाही. त्यांची तक्रार संघटनेने माझ्याकडे करावी, असे स्पष्ट केले आहे.
जिल्ह्यातील अनेक शिक्षक बंधू - भगिनींनी संघटनात्मक हेवे दावे बाजूला ठेवून परिषदने पुकारलेल्या या आंदोलनास जाहीर पाठींबा दिला होता. त्या सर्वांबरोबरच आमदार सुधीर तांबे, आ. संजय केळकर, आ. नागो. गाणार, राज्याध्यक्ष राजेश सुर्वे यांनी देखील या आंदोलनात प्रशासन आणि संघटना यांचेमध्ये समन्वय घडून आणण्यासाठी मोलाची मदत केली. त्या सर्वांचे शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे यांनी आभार मानले आहेत.
Post a Comment