पारनेर ः आमदार नीलेश लंके यांनी कोरोना काळात सर्वसामान्यांसाठी केलेले काम अभिमानास्पद अाहे. देश आणि राज्यासाठी त्यांचे हे काम आदर्शवत आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांन केले.
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज (बुधवारी) पारनेर तालुक्यातील भाळवणी येथे आमदार नीलेश लंके यांनी सुरु केलेल्या शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर येथे भेट देऊन पाहणी केली. त्यावेली ते बाेलत हाेते. या प्रसंगी पालकमंत्री मुश्रीफ यांनी या आरोग्य मंदिरासाठी दोन लाख रुपयांची मदत त्यांनी जाहीर केली.
भाळवणी येथील कार्यक्रमास आमदार नीलेश लंके, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, तहसीलदार ज्योती देवरे, गटविकास अधिकारी किशोर माने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रकाश लाळगे यांच्यासह सरपंच राहुल झावरे, बाबाजी तरटे आदींसह मान्यवरांची उपस्थिती हाेते. यावेळी पालकमंत्र्यांनी पारनेर तालुक्याचा आढावाही घेतला.
Post a Comment