गँसदाहिनीची उभारणी होणार... आमदार नीलेश लंके यांची माहिती...


पारनेर : कोरोनाने मृत्यू झालेल्यांवर अंत्यसंस्कार करताना अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे तातडीने येथे गँसदाहिनी उभारण्यात येणार आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.

कोरोनाची दुसरी लाट सुरू असतानाच तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भविष्यातील तिसऱ्या लाटेतही धोका नको म्हणून ग्रामीण रुग्णालयात आमदार निधीतून ऑक्सिजन प्लॅटची उभारणी करण्यात येत आहे. या प्लँटमध्ये रोज १२५ गॅस सिलिंडर ऑक्सिजन तयार होणार आहे.  या ग्रामीण रुग्लायासह या प्लँटला  भेट देऊन पहाणी केल्यानंतर ते बोलत होते.


आमदार लंके म्हणाले की, कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय होऊ नये, म्हणून लवकरच ग्रामीण रुग्णालयात शंभर ऑक्सिजन बेडही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

देशात व राज्यातही कोरोनाने हाहाकार झालेला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही सुविधांअभावी अनेकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. 

तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून पारनेर ग्रामीण रुग्णालयात युद्धपातळीवर ऑक्सिजन प्लॅटच्या उभारणीस सुरवात केली आहे, असे आमदार नीलेश लंके म्हणाले.

या ग्रामीण रुग्णालयात शंभर ऑक्सिजन बेडची सुविधाही सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे रुग्णांना तातडीने सुविधा मिळण्यास मदत होणार आहे. या ऑक्सिजन बेडची भविष्यात फायदा होणार आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post