पाथर्डी : शहरातील अजंठा चौकात मंगळवारी सायंकाळी आठच्या सुमारास दोन गटात सशस्त्र हाणामारी झाली. यामध्ये आठजण जखमी झालेले आहे. याप्रकरणी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
वाहनास कट मारल्याच्या कारणावरून शिरसाठवाडी व भिकनवाडातील दोन गटात रात्री आठच्या सुमारास हाणामारी झाली. यामध्ये एकूण दहाजण जखमी झालेले आहेत. त्यातील दोनजण गंभीर जखमी आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.
वाहनास कट मारल्याच्या कारणावरून ही मारामारी झाली. यामध्ये तलावरीसह शस्त्रांचा सर्रास वापर करण्यात आला. या मारामारीच्या घटनेत वाहनांचे मोठे नुकसान करण्यात आलेले आहे.
या प्रकरणी दोन्ही गटाने फिर्यादी दाखल केलेल्या आहेत. या घटनेची माहिती समजताच अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल , पोलिस उपविभागीय अधिकारी सूदर्शन मुंडे यांनी घटनास्थळाला भेटी देऊन तपासाच्या सूचना दिल्या.
या घटनेतील जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर काहींना नगरला हलविण्यात आलेले आहे.
दरम्यान या घटनेचे छायाचित्र समाजमाध्यमावर व्हायरल झालेले आहेत.त्यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. .
Post a Comment