नगर : उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे भाजीपाला उत्पादन कमी निघत असल्यामुळे दरवर्षीच महाग होत आहे. यंदाही भाजीपाल्याच्या भावात वाढ झालेली असून टोमँटो वगळता सर्वच भाजीपाला महागला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे कडक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. या उपाययोजनांची अंमलबजावणी करताना बाजार समित्यांचे व्यवहारही काही दिवस बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे भाजीपाला कोठे विकायचा असा प्रश्न शेतकर्यांपुढे उभा राहिला होता.
परंतु जिल्हा प्रशासनाने आता भाजीपाल्याची खरेदी विक्री करण्यास परवानगी दिल्याने शेतकर्यांच्या मालाला आता भाव मिळू लागला आहे.
दादापाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत भाजीपाल्याचे लिलाव झाले. यामध्ये 138 क्विंटल 15 किलो भाजीपाल्याची व 15 क्विंटल 45 किलो बटाट्याची अशी एकूण 293 क्विंटल सहा किलो आवक झाली. यामध्ये टोमँटो वगळता इतर भाजीपाल्याला चांगला भाव मिळाला.
टोमॅटोला 500 ते 700 रुपये क्विंटलचा भाव मिळाला. गेल्या काही दिवसांपासून गवार तेजीत असून आजही तेजी टिकून आहे. गवार चार हजार ते पाच हजार क्विंटल दराने विक्री झाली. नांदीही 1500 ते दोन हजार क्विंटल दराने विक्री झाली.
Post a Comment