दहावी माजी विद्यार्थी केली संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरला भेट...


निघोज :  जगप्रसिद्ध रांजणखळगे या निसर्गरम्य ठिकाणी मळगंगा भक्तीनिवास या ठिकाणी सुसज्ज इमारतीत हे कोविड सेंटर आहे. येथील व्यवस्था सुसज्ज हॉस्पिटलसारखी आहे. 

या ठिकाणी आपण देणगी दिली तर या देणगीच्या माध्यमातून आपल्याला देवदूतासारखे पुण्य नक्कीच मिळेल,अशी भावना सर्वांचीच झाली आहे.  

दहावीच्या 1988 सालच्या माजी विद्यार्थ्यांनी संदीप पाटील वराळ आरोग्य मंदिर कोविड सेंटरला 40 हजार 211 रूपयांची देणगी दिली आहे. संदीप पाटील वराळ जनसेवा फाउंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांच्याकडे ही देणगी सूपुर्द करण्यात आली. 

यावेळी माजी विद्यार्थी  सामाजिक कार्यकर्ते उत्तमराव लामखडे यांनी सामाजिक कार्याच्या माध्यमातून गाव परिसरात विकासाभिमुख कामांचा पाठपुरावा करीत सातत्याने सेवाभावी कामांना पाठबळ दिले आहे. दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचे संघटन करण्यासाठी त्यांचे योगदान मोठे आहे. 

अल्पसंख्याक समाजाचे नेते मुस्लिम समाजाचे तालुका पदाधिकारी व निघोज येथील दूध व्यवसायिक हारुणभाई तांबोळी विघ्नहर्ता सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन सुभाष साठे, देविभोयऱ्याचे विद्यमान उपसरपंच व पुणे जिल्ह्यातील नामांकित अशा संपदा पतसंस्थेचे एम. डी. संपतराव वाळुंज, तनपुरे वाडी जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र दिवसे, निघोज नागरी सहकारी पतसंस्थेचे निघोज शाखेचे शाखाधिकारी अर्जुनराव ढवळे, सेनापती बापट सहकारी पतसंस्थेचे निघोज शाखाप्रमुख व अल्पसंख्याक समाजाचे मार्गदर्शक मच्छिंद्र गोरे, प्रगतीशील  शेतकरी बबनराव शेटे आदी उपस्थित होते. सचिन वराळ पाटील यांच्या समवेत ग्रामपंचायत माजी सदस्य भिमदादा लामखडे उपस्थित होते.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post