पाथर्डी : रक्तदान शिबिर, मास्क व सॅनीटायझरचे वाटप, कोविड केंद्रांमधील रुग्णांना अल्पोपहार, कोविड रूग्ण तपासणी शिबिर अशा विविध कार्यक्रमांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा सातवा वर्धापन दिन भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहात संपन्न केला.
आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कसबा विभागातील कार्यक्रमाची माहिती देतांना नगरसेवक अनिल बोरुडे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक व्यासपीठावर भारताची मान उंचावून देशाला विकासाची दिशा दिली.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाचा पदभार स्वीकारून सात वर्ष पूर्ण झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा सर्वसामान्य माणसाला जगण्याचा आधार देणारी ठरत आहे. कोरोनाची लाट ओसरत आहे. ती पूर्णपणे आटोक्यात यावी म्हणून यानिमित्ताने जाणीवपूर्वक हा उपक्रम राबवला.
भैरवनाथ मंदिर परिसर,सुतार गल्ली या कसबा विभागातील रहिवाशांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य राहुल राजळे,तालुका अध्यक्ष माणिक खेडकर,भाजपचे ज्येष्ठ नेते हिंदकुमार औटी, अशोक चोरमले, शहराध्यक्ष अजय भंडारी, पंचायत समिती सदस्य सुभाष केकाण, सचिन वायकर, युवा मोर्चाचे अमोल गर्जे, डॉ. श्रीधर देशमुख,डॉ.श्रीराम शिरसाट, दत्ता इजारे, प्रदीप देशमुख, सुरेश काटे, अभिजीत गुजर, राजेंद्र भोसले, दादा मर्दाने आदी कार्यकर्ते हजर होते.
आमदार मोनिका राजळे कोरोना आजारावर उपचार घेत आहे. त्यांच्या सूचनेनुसार शहरासह तालुक्यात विविध उपक्रम कार्यकर्त्यांनी उत्साहात पार पाडले. यामध्ये भाजपाचे तालुका उपाध्यक्ष गोकुळ दौंड यांनी कोरडगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
भाजपाचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर यांच्या परिवर्तन प्रतिष्ठानतर्फे शहरातील निवडक कोविड सेंटर मधील रुग्णांना अल्पोपहार दिला. नगरसेविका मंगल कोकाटे यांनी शहरात मास्क व सॅनीटायझर वाटप केले.
Post a Comment