पाथर्डी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजपा सरकारला सात वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तालुक्यातील कोरडगाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
दीपाली प्रतिष्ठान मार्फत चालवण्यात येणाऱ्या स्व. गोपीनाथ मुंडे कोविड केअर सेंटरच्या माध्यमातून हे रक्तदान शिबिर घेण्यात आले होते. यासाठी कासार पिंपळगाव जिल्हा परिषद गटातील भाजपा कार्यकर्त्यांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे. अनेक तरुणांनाही रक्ताची गरज ओळखून रक्तदान केले.
भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष गोकुळ दौंड, सरपंच विष्णू देशमुख, नारायण काकडे, रणजित बेळगे, अर्जुन धायतड्क, दादासाहेब येढे, अशोक गोरे, अशोक कांजवणे, दिगंबर भवार, प्रमोद मिसाळ, संभाजी आंधळे, संदीप गिते, संतोष आंधळे, वसंत कुसळकर, बालाजी पोंधे, संजय मोहिते आदी उपस्थित होते.
कोरडगाव येथील बालकदास बैरागी हे आजार पणाने त्रस्त असून त्यांना उपचार घेण्यासाठी गोकुळ दौंड यांनी त्यांच्या पत्नीकडे रोख पाच हजार रुपये आर्थिक मदत याप्रसंगी केली आहे.
भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष गोकुळ दौंड म्हणाले की,नरेंद्र मोदीं सरकारला सात वर्ष पूर्ण झाले आहे. आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदशनाखाली व सूचनेनुसार रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रधानमंत्री यांनी "सबका साथ सबका विकासाचा" नारा देत देशातील सर्व स्थरातील लोकांना न्याय देण्याचे काम केले आहे. त्यांच्या नेवृत्वाने भारत देशाने प्रगती केली आहे. परदेशातही भारताचा दबदबा वाढला आहे, असे दौंड म्हणाले.
जनकल्याण रक्तपेढीचे डॉ विलास मढीकर यांनी आयोजकांचे आभार मानले .
Post a Comment