वडनेर गाव पाच दिवस कुलूपबंद...कोरोना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू

वडनेर ः गेल्या दोन- तीन दिवसांपासून वडनेर (ता. पारनेर)मध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठया प्रमाणात आढळून आली आहे. त्यामुळे गावातील कोरोना महामारीचा प्रसार रोखण्यासाठी येथील कोरोना दक्षता समितीने अत्यावश्यक सेवा वगळता पाच दिवस गाव कुलूपबंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 12 ते 16 मेपर्यंत जिल्हा व तालुका प्रशासनाच्या आदेशानुसार पाच दिवस गाव बंद ठेवण्यात येणार आहे.

या कालावधीत अत्यावश्यक सेवा, दवाखाने, मेडिकल, आरोग्य उपकेंद्र, ग्रामपंचायत कार्यालय वगळता सर्व दुकाने पाच दिवसांसाठी कुलूपबंद करण्यात येत आहे. ग्रामस्थांनी शेतातील कामे स्वतःच घरच्या घरी करावीत. बाहेरून येणाऱ्या मजुरास पूर्णपणे बंदी असणार आहे. विनाकारण फिरणाऱ्यास पूर्णपणे बंदी असणार आहे. 
 
होम आयसोलेशन पूर्णपणे बंद करण्यात आलेले आहे. कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास त्वरीत विलगीकरण कक्षात दाखल होण्याबाबत सूचना देण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणा-यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे कोरोना दक्षता समितीने सूचित केले आहे.

दरम्यान गावात चार विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले आहे. रुग्णांच्या संपर्कातील जवळच्या वीस व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम नेमलेल्या कर्मचाऱ्यांकडून तात्काळ होत आहे. समुपदेशन करून आरोग्य कर्मचाऱ्यांकडून आरोग्य तपासणीही केली जात आहे. ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी कर्मचारी, आरोग्य कर्मचारी,शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर हे सर्वजण या लढाईत युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे.
 
त्याचबरोबर गृहभेटी देऊन सौम्य लक्षणे असलेल्यांना समुपदेशन करून तपासणी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कोरोनाच्या या महामारीत गावपातळीवर सरपंच राहुल सुकाळे, उपसरपंच पूनम खुपटे, ग्रामपंचायत सदस्य मनिषा बाबर, राहुल बाबर, शैला जगदाळे, रमेश वाजे, रेखा येवले, आशाबाई चौधरी, संतोष पवार, शोभा येवले, स्वाती न-हे, ग्रामसेवक हरिश्चंद्र काळे, तलाठी दीपक गोरे, डॉ.प्रविण नरसाळे, मुख्याध्यापक पांडुरंग खोदडे, नवनाथ शेंडकर, गणपत देठे, राजू इनामदार, बाळासाहेब पडवळ, आरोग्यसेविका रईसा शेख, विशाल चौधरी, शिक्षक बाळासाहेब दिघे, किरण पाडळकर, मुकुंद जगदाळे, सुभाष माने, संतोष दहिवळ, सुभाष सोनवणे, संगीता शेंडकर, काळूराम दरेकर, रंगनाथ रसाळ, मंगल वाळके, राजेंद्र बाबर, प्रमिला निघुट, सत्यवान औटी, बाळू पांढरे, दत्तात्रय निघुट, अंगणवाडी कर्मचारी संध्या खुपटे, पूनम गजरे, माया पडवळ, सुरेखा मेचे, कविता सोनवणे, आशा वर्कर विद्या भालेकर, अलका वाजे, मदतनीस संगिता भालेकर, ग्रामंपाचयत कर्मचारी शेखर थोरात, धनंजय वायदंडे हे सर्व पदाधिकारी व कर्मचारी ग्रामस्थांच्या मदतीने कोरोना रोखण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post