कर्जत ः कर्जत येथील व्यावसायिक रणजित जांभळे, दिनेश ढवळे, संतोष कवडे यांच्यातर्फे कोरोनाच्या काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना सॅनिटाइझर, पाणी, हॅन्डग्लोजचे वाटप करण्यात आले.
सध्या सुरू असलेल्या लोकडाऊनच्या काळात सर्वत्र बंद असताना पोलिस अधिकारी, कर्मचारी, होमगार्ड, पोलिस मित्र रस्त्यावर उभे राहून काम करीत असताना त्यांना पाणी अल्पोपहार मिळत नाही. यासाठी कर्जत येथील व्यावसायिक रणजित जांभळे, दिनेश ढवळे, संतोष कवडे यांनी एकत्र येऊन पोलिस ठाण्यात बिस्किट, पाणी, सॅनिटाइझर आदी साहित्य पोलिसांना दिले.
यावेळी पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश माने, पाेलिस हेडकाॅन्स्टेबल हंचे,पोलिस काॅन्स्टेबल मनोज लातूरकर, श्यामसुंदर जाधव, सचिन वारे, अमित बरडे, शकील बेग यांच्यासह व्यापारी घनश्याम नाळे, तात्यासाहेब क्षीरसागर आदी उपस्थित होते.
Post a Comment