कर्जत : रासायनिक खते यासह पेट्रोल व डिझेल यांच्या दरात झालेली भाववाढ पाहता केंद्र सरकार गोरगरीब जनता आणि शेतकऱ्यांवर अतिरिक्त भार टाकत आहे. तातडीने ती रद्द करत दिलासा द्यावा, अन्यथा कर्जत राष्ट्रवादी भविष्यात जनआंदोलन उभारले या आशयाचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस युवकतर्फे तहसीलदार नानासाहेब आगळे यांना देण्यात आले. यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मागील अनेक महिन्यांपासून केंद्र सरकार रासायनिक खते, पेट्रोल आणि
डिझेलच्या दरात मोठी भाववाढ करीत आहे. सर्वसामान्य जनतेवर व शेतकऱ्यांवर
अतिरिक्त भार टाकत आहे. अगोदरच शेतमालाला हमीभाव नसल्याने सर्वसामान्य
शेतकरी, छोटे व्यावसायिक यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यास केंद्र सरकारच
जबाबदार आहे.
सरकारने तात्काळ शेतीविषयक खते आणि इंधनावरील दरवाढ मागे घेत
सर्वसामान्याना दिलासा द्यावा अन्यथा कर्जत राष्ट्रवादी भविष्यात मोठे
जनआंदोलन उभारेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
यावेळी कर्जत
तालुका युवकचे अध्यक्ष नितीन धांडे, शहराध्यक्ष सुनील शेलार, युवक शहरचे
प्रा विशाल मेहत्रे, भास्कर भैलुमे, महिला आघाडीच्या डॉ शबनम इनामदार,
नगरसेविका मनीषा सोनमाळी, सोशल मीडियाचे दीपक यादव, सचिन मांडगे, राहुल
नेटके, प्रतीक ढेरे, आशिष काळदाते, बाबा भिसे, संदीप गावडे, राहुल खराडे,
सचिन धांडे, सचिन लाळगे आदी उपस्थित होते.
Post a Comment