पाथर्डी : कोरोना संक्रमणाच्या काळात टाळेबंदी मुळे गरीब लोकांच्या हिरावलेल्या रोजगाराची समस्या उग्र रूप धारण करत आहे. त्यामुळे शहर उपनगरात चोऱ्यांचे व प्रमाण वाढत आहे. या चोऱ्यांना आळा काळात घालण्यासाठी मागील शहरात नावीन्यपूर्ण योजनेतील निधीमधून बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या जाळ्याची व्याप्ती वाढवून प्रत्येक उपनगरात मोक्याची ठिकाणे हेरून आगामी काळात उपलब्ध होणाऱ्या निधीमधून अधिकाधिक उपनगरे निगराणीखाली आणावीत, अशी मागणी नगरसेवक प्रसाद आव्हाड यांनी केली आहे.
याबाबत नगरसेवक प्रसाद आव्हाड यांनी पालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना निवेदन दिले असुन दिले. गेल्या आठवड्यात भगवान नगर परिसरातील अनेक दुचाकी चोरीला गेल्यावर येथील नागरिकांची कैफियत यावेळी नगरसेवक आव्हाड यांनी मुख्याधिकाऱ्यांपुढे मांडली.
तसेच भगवान नगर, दत्तनगर लगत डोंगराच्या पायथ्याशी भटक्या समाजातील लोक अनधिकृतपणे राहत आहेत. त्यांच्या वर्तन, व्यवहाराचा लगतच्या नागरिकांना मनस्ताप सोसावा लागतो. कोरोना संक्रमणाच्या काळात या लोकांपासून स्थानिकांना अधिक धोका संभवतो.
या अतिक्रमण धारकांचा वाढत्या चोऱ्यांच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त व्हावा या मागणीचे दिनांक सात जुलैला तहसीलदार, मुख्याधिकारी आदींना दिलेल्या पत्राचे स्मरण पुनःश्च एकदा आव्हाड यांनी प्रशासनाला करून दिले.
मुख्याधिकारी कोळेकर यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आगामी काळात प्राधान्याने हा विषय मार्गी लावण्याचे सांगत नागरिकांना आश्वस्त केले.
यावेळी विजय शिंदे, निखिल घोडके, धनंजय थोरात, प्रशांत शेळके, प्रसाद देशमुख, मयूर खेडकर आदी उपस्थित होते.
Post a Comment